Meet our team

Medical Expert's

Dedicated Professionals Committed to Your Health

Introduce your doctors, nurses, and staff with their qualifications, experience, and specializations. Include photos to make it personal and relatable.

Dr. Chandrakant Murlidhar Shewale
B.H.M.S (MUHS), C.C.M.P.(Gov. Medical College Dhule)
होमिओपॅथीक तज्ञ, फॅमिली फिजिशिअन व सर्जन
B.H.M.S MUHS (होमिओपॅथीक तज्ञ, फॅमिली फिजिशिअन व सर्जन)
Rg. No. 69860

मागील १० वर्षांपासून सातपूर-अंबड पंचक्रोशीमध्ये अखंडपणे वैद्यकीय सेवा देत असून, रुग्णसेवेसाठी नेहमीच तत्पर आहे.

वैद्यकीय शिक्षणानंतर Advanced Pharmacology हा अभ्यासक्रम धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयात यशस्वीरित्या पूर्ण केला. सेवा देत असताना विविध उद्योगसंस्थांमध्ये Industrial Trauma Care, Fitness Guidance, तसेच Life-Saving Demonstrations च्या माध्यमातून जीव वाचवण्याचे कार्य सातत्याने केले आहे.

Diabetes व Thyroid या आजारांचे सखोल व्यवस्थापन करता यावे यासाठी खालील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत:

D.E.E.P. – Diabetic Education and Empowerment Program

T.I.M.E. – Thyroid Insight & Management Education

रुग्णांच्या आजारांवर उपचार करताना, त्याचबरोबर त्यांचं एकंदर आरोग्य सुदृढ राहावं यासाठी मार्गदर्शन देणे हेच माझं प्रमुख ध्येय आहे. अनेक रुग्णांचे फॅमिली डॉक्टर म्हणून दीर्घकाळ कार्य करत असून, सतत आरोग्यविषयक योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न करत आलो आहे.

Dr. Leena Chandrakant Shewale
B.A.M.S MUHS (आयुर्वेदिक तज्ञ, फॅमिली फिजिशिअन व स्त्रीरोगतज्ज्ञ)
B.A.M.S. – अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय, मांजरी हिल, संगमनेर
Rg. No. I-87989-A

डॉ. लीना शेवाळे यांनी संगमनेर येथील अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेद पदवी घेतली असून, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपदरम्यान अनेक प्रसूती आणि प्रसूतीपूर्व मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.

ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देतानाचा त्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे. विशेषतः स्त्रियांच्या वाढत्या थायरॉइड समस्यांकडे लक्ष देऊन, त्यांनी थायरॉइडवरील विशेष अभ्यासक्रम पूर्ण केला असून, आजही त्या थायरॉइड मार्गदर्शन आणि उपचार क्षेत्रात सक्रिय आहेत.

स्त्रीरोग व प्रसूतीपूर्व मार्गदर्शन या क्षेत्रात त्यांना दीर्घ अनुभव आहे. यासोबतच त्यांनी जुने त्वचारोग व केसांच्या समस्यांवर आयुर्वेदीय पद्धतीने प्रभावी उपचार दिले आहेत.

त्यांची उपचारपद्धती ही आधुनिक गरजांनुसार आयुर्वेदाची शास्त्रशुद्ध आणि सुसंगत सांगड घालणारी असून, संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्यदायी जीवनशैली घडवण्यावर त्यांचा भर असतो

Book Appointment